!! श्री भगवान विश्वकर्मा !!

————————————————————————————

भगवान विश्वकर्मा

भगवान विश्वकर्मा


देवांचे वास्तुकला तज्ञ आहेत. त्यांनी भगवान श्रीकृष्णासाठी द्वारका,पांडवासाठी हस्तिनापूर व रावणासाठी सोन्याची लंका तयार केली. या नगरांच्या रचनेत, सौंदर्य, अचुकता व सुखसोयी यांचा मिलाप होता. ते वास्तुशास्त्राचे पहिले प्रणेते आहेत.

भगवान विश्वकर्मा यांनी लंकेत प्रवेश करण्यासाठी श्रीरामाला सहकार्य केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली हनुमान, नल−निल या सारख्या वानरसेनेतील स्थापत्य तज्ञांनी रामसेतू बांधला.भगवान विश्वकर्मा यांनी १४ ब्रम्हांडाची रचना केली. त्यात वायुमंडळ, कैलास,वैकुंठ, ब्रम्हपुरी, इंद्रपुरी,स्वर्ग, पृथ्वी, पाताळातील नागलोक इत्यांदिंची रचना केली होती.


त्यांनी ‘विश्वकर्मा वास्तुशास्त्र’ या ग्रंथाची रचना केली.ब्रह्माच्या इच्छेनुसार त्यांनी नित्य नवीन औजारे शोधलीत.त्यांना सौर उर्जा वापरण्याचे व त्या उर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान प्राप्त होते. सूर्याचे या शक्तिचा वापर करून त्यांनी विष्णु शिव व इंद्रासाठी क्रमाने सुदर्शन चक्र, त्रिशूळ व विजय रथ निर्माण केला. ते हरहुन्नरी होते.अन्य विविध शास्त्रांच्या निर्माणात, त्याचे नियम ठरविण्यात,व त्या त्या शास्त्रांच्या विकासास त्यांनी हातभार लावला.शस्त्रे व अस्त्रे, अलंकार, विमान आदिंचेही त्यांनी निर्माण केले.सुमारे १२००च्या जवळपास यंत्र-तंत्र,शस्त्रास्त्रे व साधनांच्या त्यांनी निर्मिती केली. पांडवांसाठी मयसभा बनविणारा मयासूर त्यांचा शिष्यच होता.

आजही सोनार,लोहार,सुतार,कुंभार,कासार इत्यादी समाज त्यांना आपले दैवत मानतात.भारतात दिनांक १७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय श्रम दिवस आणि त्यांची जयंती म्हणुन साजरा करण्यात येतो.

————————————————————————————

» विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय

हे पुण्यामधले (महाराष्ट्र, भारत) एक आघाडीचे अभियान्त्रिकी महाविद्यालय आहे. याची स्थापना १९८३ साली झाली. बन्सीलाल रामनाथ अगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट्ने चालवलेले एक खाजगी महाविद्यालय आहे. हे महाविद्यालय पुणे विद्यापीठाशी संलग्न आहे. गेल्या २४ वर्षामधे हे पुण्यामधील एक आघाडीचे महविद्यालय बनले आहे. इथे अभियन्त्रिकीमधील पदवी, ऊच्चशिक्ष आणि पी.एच्.डी यान्चे शिक्षण दिले जाते.

» व्हि. आय्. टी. मधील विभाग

१.मेकॅनिकल अभियांत्रिकी
२.ईलेक्ट्रॉनिक्स् अभियांत्रिकी
३.इन्स्त्रुमेन्टल् अभियांत्रिकी
४. रसायन अभियांत्रिकी
५.ईलेक्ट्रॉनिक्स् आणि दूरसंचारताभियांत्रिकी
६.ईन्डस्ट्रीयल अभियांत्रिकी
७.संगणक अभियांत्रिकी
८.प्रॉडक्शन अभियांत्रिकी
९.माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी

————————————————————————————

!! श्री विश्वकर्मा प्रसन्न !!

समाजाची प्रगती हि समाजाच्या प्रत्येक घटकावर अवलंबून असते, त्यामुळे काही विशिष्ठ व्यक्ती यासाठी जबाबदार असूच शकत नाही. प्रत्येक समाज बांधवाने पुढे येऊन चांगला समाज घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्याला एखादा चांगला समाज घडवायचा असेल, तर सुरुवातही आपल्यापासूनच झाली पाहिजे हे मात्र विसरता कामा नये.

१. शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती होऊ शकत नाही. सक्षम व्यक्ती निर्माण करण्यासाठी शिक्षण हे आवश्यक आहे. 
२. समाजाची प्रगती संघटितपणातूनच होऊ शकते. त्यामुळे सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. 
३. ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाला गाठीशी बांधून तरुण पिढीने प्रवास केला तरच समाजाची प्रगती होईल.
४. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणाऱ्या समाजाची प्रगती जलदगतीने होते.

आपणही आपले मत नोंदवून आपले विचार व्यक्त करावेत, हि नम्र विनंती.

————————————————————————————

Advertisements

One comment on “

  1. सिक्छण योग्य मार्ग पर ही विस्वास ?दहेज प्रथा बंन्द हो

आपलं मत आमच्या पर्यंत पोहोचवा.

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s